![]() |
| Advertisement |
जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परिक्षाबाबत सुचना
अकोला,दि.24:-सर्व प्राचार्य/मुख्याध्यापक यांना कळविण्यात येते की जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2018 चे प्रवेश अर्ज ऑफलाइन पध्दतीने भरण्याचा विकल्प उपलब्धकरुन देण्यात आला आहे. ज्या विद्याथ्यांनी यापूर्वी प्रवेश अर्ज CSC केन्द्रामार्फत भरला असल्यास त्यांनी परत अर्ज दाखल करण्याची आवश्यक्ता नाही सदरील अर्जाच्या विहित नमुण्यात (विद्यालय वेबसाइड www.jnvakola.org.in वरुन डाउनलोड करता येईल) भरुन मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीसह जवाहर नवोदय विद्यालय,बाभुळगाव (जहॉ) अकोला येथे दिनांक 25 नोव्हेंबर 2017 पुर्वी जमा करावा. अधिक माहिती साठी कार्यालयीन वेळेत जवाहर नवोदय विद्यालय बाभुळगाव (जहॉ) अकोला किवा दुरध्वनी क्रमांक 0724-2258981 येथे संपर्क साधावा असे प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय बाभुळगाव (जहॉ) अकोला यांनी कळविले आहे.



0 Comments:
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.