![]() |
| Advertisement |
शिकलेली आई घराला पुढे नेई ही म्हण सर्वश्रुत आहे. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात जोपर्यंत समाज महिलांना शिक्षण देत नाही तोपर्यंत या समाजाची प्रगती होत नाही. कोणत्याही देशामध्ये पुरुष आणि महिलांची संख्याही अर्धी अर्धी असते. जेवढी संख्या पुरुषांच्या आहे तेवढी संख्या महिलांची आहे. कोणत्याही देशाची प्रगती मोजायची झाल्यास त्या देशातील महिलांचे शिक्षण किती झाले आहे कसे झाले आहे यावरन त्या देशाची प्रगती मोजता येते. त्यामुळे महिलांना निरक्षर ठेवून प्रगती करता येत नाही. जर राष्ट्राची प्रगती करायची असेल तर महिलांनाही साक्षर केले पाहिजे.त्यांनाही उच्च शिक्षण दिले पाहिजे. महिलांनी स्वतः शिक्षणात येऊन पुढाकार घेतला पाहिजे. आई जर शिकलेली असली तर तीही मुलांना घरी व्यवस्थित पणे शिक्षण देऊ शकते त्यांचा अभ्यास येऊ शकते. नवीन पिढी घडवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात प्रभावी कामगिरी करावी राष्ट्राला घडवण्याची जबाबदारी ही शिक्षकांवर असते.
प्राथमिक शाळेचे शिक्षक होण्यासाठी प्रथम बारावी झाल्यानंतर डि.एड. करावे लागते. हायस्कूलमध्ये शिक्षक होण्यासाठी पदवी परीक्षेनंतर बी.एड. करावी लागते ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षकांसाठी पदव्युत्तर पदवी मिळवून नंतर डिलीट किंवा अशी शैक्षणिक पात्रता असावी लागते जर सीनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापकांच्या पदासाठी तसेच पदव्युत्तर परीक्षांकरिता किमान 25 टक्के गुण मिळवणे आवश्यक असते. त्यासोबतच किंवा पीएचडी केलेली असल्यास प्राधान्य मिळते प्राध्यापकाच्या पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची. यूजीसीची नेट परीक्षा पास करावी लागते. यूजीसीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये येते किंवा तुम्ही युसीजीच्या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता. नेट परीक्षेला पर्याय म्हणून सेट परीक्षा देता येते. ही परीक्षा पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येते.
डीएड बारावी उत्तीर्ण झालेले मुलं-मुली या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात अर्ज केल्यानंतर आपल्याला हव्या त्या कॉलेजच्या पसंतीक्रम टाकून त्या कॉलेजला आपल्या परसेंटेज प्रमाणे निवड होऊ शकते बारावीनंतर दोन वर्षाचा हा डिप्लोमा कोर्स पूर्ण करता येतो आणि सरकारी किंवा प्रायव्हेट स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी मिळवता येते.
बीएड अभ्यासक्रम पूर्वी पदवीनंतर दोन वर्षे मुदतीचा होता. 2019 मध्ये बदल करून हा अभ्यासक्रम बारावीनंतर चार वर्षाचा करण्यात आलेला आहे.
बी.पी. एड
महिलांची पदवी पूर्ण झाल्यानंतर त्यांना खेळाची आवड आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाची पात्रता बरीचशी बीएडच्या अभ्यासक्रमा सारखी आहे. शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त खेळाडू असलेल्यांना या प्राधान्य दिले जाते. या अभ्यासक्रमाचा कालावधी हा एक वर्ष मुदतीचा आहे. ही पदवी पूर्ण केल्यानंतर शाळा-कॉलेजमध्ये शारीरिक शिक्षक म्हणून जॉब मिळू शकते किंवा स्वतः आवड म्हणून, असलेल्या विषयात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो.
स्पेशल एज्युकेशन
मूकबधिर अंध अपंग मुलांच्या शाळेचे शिक्षक होण्यासाठी महिलांना स्पेशल एज्युकेशनची पदविका घेणे गरजेचे असते. कला शिक्षकाची सुद्धा अशा शाळांना गरज असते. ज्या महिलांना या क्षेत्रात जायचे असेल त्यांनी याबद्दलची सविस्तर इन्फॉर्मेशन. इंटरनेट वर शोधून जमा करावी.



0 Comments:
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.