![]() |
| Advertisement |
पूर्वी महिलांना शिक्षणाची दारे बंद होती. आता महिलांनाही शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. त्यामुळे महिलांना आपली प्रगती सिद्ध करण्याची संधी मिळते आहे. दहावी आणि बारावीमध्ये चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनींची बोर्डातील संख्या दिवसेंदिवस वाढते आहे तरीही काही कुटुंबातील स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते त्यांचा आदर केला जात नाही. काही कुटुंबात तर मुलीला जन्माला सुद्धा घालत नाही. मुलीला जन्घामास घालत नाहीत म्हणून सरकारने बेटी बचाव बेटी पढाव अशी घोषणा केली आहे. व मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून शासनाने सुकन्या योजना सुरु केली आहे. या प्रकरणात आपण शिक्षित तथा अशिक्षित किंवा उच्चशिक्षित महिलांसाठी कोणकोणते करिअरचे पर्याय उपलब्ध आहेत याचा अभ्यास करणार आहोत
चूल आणि मूल ही एकच म्हण स्त्रियांसाठी लागू होती या म्हणीचा अर्थ व्यापक होता की महिलांनी पुरुषांसाठी जेवण बनवणे आणि मुलं सांभाळणे एवढेच काम करायचं ते त्यांनी बाहेरची कामं कोणतीही करू नये किंवा माणसाच्यामध्ये बोलू नये अशा विविध प्रकारच्या अटी महिलांसाठी होत्या महिलांना संधी मिळाली तर महिलाही संधीचे खूप मोठे सोनं करू शकतात भारतीय संविधानाने महिलांना व पुरुषांना समान अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे समान कामासाठी समान वेतनही दिल्या जाते. संविधानाने संधी दिल्यामुळे भारताच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर महिला जाऊ शकते हे आपण पाहिलेले आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या कुवतीप्रमाणे, आवडीप्रमाणे, इच्छे प्रमाणे कोणताही व्यवसाय करण्यास काही हरकत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. पुरुषांपेक्षा सरस काम करत आहेत. अशाच काही महिलांसाठी असलेल्या करिअरची माहिती आपल्यासाठी देत आहोत
चूल आणि मूल या मुली तसेच महिलांनी आपले करिअर करण्याचे ठरवले आहे काही ठिकाणी महिलांनी खानावळी सुरू केलेल्या आहेत खानवडी तू नही चांगला व्यवसाय किंवा चांगली आर्थिक प्राप्ती होऊ शकते. काही स्त्रिया स्वयंपाक बनवून देण्याचे पैसे घेतात पाचशे ते सहाशे रुपये प्रति व्यक्ती प्रमाणे जेवण बनवून देण्याचे पैसे घेतात. तो एक यांच्यासाठी स्वयंरोजगाराच आहे. त्यातूनही स्त्रिया चांगली अर्थप्राप्ती करत आहेत काही स्त्रियांनी हो स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू करून त्यातून अर्थप्राप्ती करीत आहेत.
लहान मुलं सांभाळणे सुद्धा एक करिअर होऊन बसले आहे विभक्त कुटुंबपद्धती असल्यामुळे कामावर जाणारे दाम्पत्ती त्यांच्या अपत्यांना पाळणाघरांमध्ये ठेवतात. पाळणाघर चालवणे हे सुद्धा एक उत्तम करिअर बनले आहे. मुलाला जन्माला घालते सुद्धा एक उत्तम करिअर होऊ शकते त्याला सरोगेट मदर म्हणतात आणि सरोगेट मदरला भारतामध्ये अजून कायदेशीर व्यवसाय करण्याची मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे भारतातील स्त्रियांसाठी फारशी करिअर महत्त्वाचे नाही



0 Comments:
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.