![]() |
| Advertisement |
आपण करिअरचे नियोजन करीत असताना विविध बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी करिअरची निवड कोणी करावी पालक की पाल्याने, कधी करावी, कोणत्या वयापासून की कोणत्या वर्गापासून करिअरची निवड करावी कशी करावी या विषयी संपूर्ण माहिती पाहिली असता असे निदर्शनास येते की, करिअर नियोजन ही किचकट प्रक्रिया आहे. एखादा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांचा अंगात जसे रक्त सळसळणार्या असल्या सारखा अनुभव आहे.
वर्गात खुर्चीवर बसून पाण्यात पडल्यानंतर पाण्यात कसे पहायचे याचे प्रशिक्षण घ्यायचे एक-दोन महिने प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना पाण्यात ढकलून द्यायचे व दोन महिने जमिनीवर पोहण्याचे प्रशिक्षण दिल्यानंतरही पाण्यात पोहता येत नाही. म्हणून त्यांना दमदाटी करायची हे खूप झाले. बाता करणे सोपे असते प्रत्यक्ष अनुभव शिवाय एका संरक्षणात्मक परिघात प्रशिक्षण घेणे ही सोपे असते परंतु अशा प्रकारच्या संरक्षणात पोहणे मात्र जमत नाही. याचे भान असणे गरजेचे असते. तसेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात असते.
कोणी कसे वागले पाहिजे कोणी कसे खेळले पाहिजे. कोणी कसे बोलले पाहिजे. कोणी घरातील सामान कोठे ठेवले पाहिजे याविषयी मार्गदर्शन करणे सोपे असते परंतु स्वतः ते आचरणात आनणे कठीण असते. हे असे का घडते कारण स्वतः पळ काढूवृत्तीमुळे आणि मृत्यूमुळे अनामिक भीतीमुळे असे घडत असते.
जमिनीवर पाण्यात पोहण्याचा सराव करणे हे प्रत्यक्ष पाण्यात पोहण्याच्या सरावापेक्षा कठीण आहे. जमिनीवर पोहण्याचा सराव केल्याने पोहता तर येत नाहीच व उलट पाण्यात जाण्याची भीतीवाढत जाण्याची शक्यता असते, परंतु सरळ पाण्यात उतरून पोहण्याचा सराव केल्यास वेळ तर वाचतोच शिवाय पाण्याची भीती ही राहत नाही. तसेच जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आहे. नवीन क्षेत्रात उतरण्यापूर्वी त्याचे नियोजन करणे आवश्यक असले तरी त्या कामात अपयश येण्याची भीती आहे म्हणून कामाला सुरुवात न करणे हे अपयशापेक्षा मोठे अपयश आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक करिअरच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. त्या करिअर पर्यंत कसे पोहचायचे किंवा त्याचे नियोजन कसे करायचे हा एक मोठा प्रश्न विधार्थी आणि पालका समोर असतो. त्यासाठी करिअर सल्लागाराची मदत घेऊ शकता.
करिअर कौन्सेलिंग म्हणजे काय त्याची प्रक्रिया कशी असते. करियरची यादी पाहणे आधी योग्य करिअर निवडण्यासाठी सर्वप्रथम स्वतःचे स्वयम् परीक्षण करून स्वतःच्या क्षमतेचा अंदाज घ्या.आपल्या कौशल्याची यादी व क्षमता कोणत्या करिअरसाठी योग्य आहे त्याची पडताळणी करा. त्यासाठी स्वतःचे नीट परीक्षण करण्यात आले पाहिजे. शिवाय भरपूर करियर आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्षमता व कौशल्य याची माहिती गोळा करा.
पण हे प्रत्येकाला करणे सर्व शक्य आहे का? ती माहिती कुठून गोळा करायची माहिती आहे का?
मग अशा परिस्थितीत काय करावे.
प्रकृती ठीक नसेल तर कुठे जाता .......डॉक्टर कडे
कोर्टाचे काम असेल तर कोणाकडे जातात.....वकिलाकडे
घराचे डिझाईन करायचे असेल तर कोणाकडे जाता......आर्किटेक्चर कडे
नळाचे काम करायचे असेल तर कोणाकडे जातात.....प्लंबर कडे
इलेक्ट्रिकचे उपकरण बिघडली तर कोणाकडे जातात....इलेक्ट्रिशियन कडे
ज्या शिक्षणावर आपलं संपूर्ण आयुष्य अवलंबून आहे. त्यात शिक्षणाची किंवा करीयरची निवड करायची असेल तर ते स्वतः का करता कौन्सिलरकडे जा आणि करिअर निवडण्यासाठी त्यांची मदत घ्या नक्कीच जीवन आनंददायी असेल
करिअर उन्नतीचे कौन्सलर तुमच्या करिअरचे नियोजन करून देतील त्त्यासाठी तुम्ही ह्या ब्लोगला फालो करा. किंवा प्रत्यक्ष फोन करून किंवा मेल करूनही तुम्ही हे करू शकता त्यासाठी फोन न. 9371524141 मेल editor.careerunnati@gmail.com




0 Comments:
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.