कंपनी सेक्रेटरी या करिअर बद्दलची संपूर्ण माहिती How to Become a Company Secretary CS

ad300
Advertisement
                                नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण कंपनी सेक्रेटरी या करिअर बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

                ज्यावेळेस आपण शिक्षण घेण्यास सुरुवात करतो. आपल्यापुढे निश्चितच उद्दिष्ट नसते. जसं आपले शिक्षण घेणे चालू असते. त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की आपण ही शिक्षण कशासाठी घेत आहोत. दहावीमध्ये असतानी. कोणी विचारते की दहावी झाल्यानंतर काय करशील. बारावी झाल्यानंतर काय करशील. त्यावेळेस आपल्याला आपण काहीतरी करण्यासाठी शिक्षण घेत आहोत याची जाणीव होते. त्यावेळी आपण काय करायला पाहिजे. कोणता करिअर निवडले पाहिजे. हे माहीत नसते. हे माहीत नसल्याचं कारण की आपण त्याच्याबद्दल कधी तसा विचार केलेला नसतो. या बाबीचा आपण विचार करतो त्याबद्दल आपल्याला माहिती होत राहते.

                त्या माहितीचा उपयोग आपण ज्ञानामध्ये करतो. आपण कुठलं करिअर निवडायचं किंवा कसं निवडायचं निवडायचं असे अनेक विचार आपल्या मनामध्ये असतात. त्या करिअर बद्दल संपूर्ण माहिती आपल्याला नसते. त्यामुळे आपण त्या दिशेकडे वळत नाही. आजच्या या लेखामध्ये. कंपनी सेक्रेटरी बद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. 
                    कंपनी सेक्रेटरी चे कामे काय असतात. कंपनी सेक्रेटरी कोणाला बनता येते. कंपनी सेक्रेटरी बनल्यानंतर किती पेमेंट मिळते. कंपनी सेक्रेटरी बनण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे. कंपनी सेक्रेटरी किती दिवसात बनता येते. किती कालावधी लागतो. अशा प्रकारच्या तुमच्या मनातील विविध प्रश्नांची उत्तरे या लेखामध्ये तुम्हाला मिळतील. चला तर आता पाहूया कंपनी सेक्रेटरीला करावी लागणारी कामे.

कामे
                कंपनी सेक्रेटरीला मराठीमध्ये कंपनी सचिव सुद्धा म्हणतात. कंपनी सचिवाला जर कंपनी सचिव कंपनीमध्ये काम करत असेल तर. त्याला कंपनीचे कामे करावी लागतील. जर कंपनी सचिव वेगळा उद्योग करत असेल. वेगळा उद्योग म्हणजे स्वतःचा व्यवसाय, तर कंपनी सचिवाला त्याच्या क्लायंटची गरजे प्रमाणे काम करावे लागते. कंपनी सचिव कंपनीचे सेक्रेटरीयल ऑडिट करीत असतो. कंपनीची कायदेशीर बाजू सांभाळत असतो. बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि कंपनीचे भागधारक यांचात मध्यस्त म्हणून भूमिका पार पाडत असतो. अश्या प्रकारची विविध कामे कंपनी सेक्रेटरी करावी लागतात.

                    कंपनी सेक्रेटरी कंपनीमध्ये काम करत असताना. कंपनीचे अंतर्गत आणि बाह्यनियमा प्रमाणे विधीवत  व्यवस्थापन करायचे असते. कंपनी सचिव कंपनीचे सेक्रीटरियल ऑडिट करत असतो. तो संचालकांना कायदेशीर सल्ला देत असतो. ज्या कंपन्या देशी विदेशी कंपन्यांची मर्जर होत असतात याचे विलीनीकरण होत असते अशा कंपन्यांबाबत कायदेशीर सल्ला देण्याचे कामही कंपनी सचिव करीत असतो.भारतामध्ये कंपनी चालवण्यासाठी विविध प्रकारचे कायदे आहेत.या संपूर्ण कायद्याची अंमलबजावणी करण्याचे कामकंपनी सचिवाची असते. ज्या कंपनीला शेअर बाजारांमध्ये आपली कंपनी लीस्टेड करायची आहे. त्या कंपनीला कंपनी सचिवांकडून कंपलाईंन्स  सर्टिफिकेट मिळवणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे ज्या कंपनीचे भाग भांडवल दहा लाखांपेक्षा जास्त आहे. कंपनी सचिवाचे कंपलाईन सर्टिफिकेट सर्टिफिकेट मिळवणे बंधनकारक आहे. ज्या कंपनीचे भांडवल दोन कोटीपेक्षा अशा कंपनीमध्ये कंपनी सचिवाची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. कंपनीचा जीएसटी भरणे. कंपनीचे अंतर्गत ऑडिट करणे करणे. इत्यादी कामे कंपनी सचिवास करावे लागतात. 
 पात्रता
                    चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण कंपनी सचिव बनण्यासाठी काय पात्रता लागते. याचा विचार आता आपण करूया. कंपनी सचिव बनण्यासाठी कोणत्याही विद्याशाखेतील उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते दहा अधिक दोन (10+2) ह्या पॅटर्नप्रमाणे तुम्ही कोणतेही शिक्षण घेतलं असले तरी कंपनी सेक्रेटरी बनवू शकता. तुम्ही पदवी घेतलेली असेल तरी तुम्ही यासाठी पात्र आहात. ज्यांनी फाईन आर्ट मधून घेतली आहे. तेच विद्यार्थ्या यासाठी प्रवेश घेऊ शकत नाही.

कंपनी सेक्रेटरीची परीक्षा वर्षातून चारदा देता येते.
    पहिल्या परीक्षेस कंपनी सेक्रेटरी एंट्रन्स एक्झाम टेस्ट (सीएसइइटी) असे म्हणतात. 
    कंपनी सचिवाची दुसरी परीक्षा असते. त्यास एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम म्हणतात.
   तर तिसऱ्या परीक्षेस प्रोफेशनल प्रोग्रॅम म्हणतात
                    या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला प्री प्रोफेशनल ट्रेनिंग हे नोंदणीकृत कंपनी सचिवाकडे करायचे असते. त्यासाठी कालावधी 15 महिन्याचा असतो. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर. विद्यार्थीला कंपनी सचिव म्हणून नोंदणी करायची असते. ही नोंदणी दी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया. (आयसीएसआय) या संस्थेकडे करायची असते. आयसीएसआयम्हध्ये नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्याला. स्वतःचा व्यवसाय करण्यास किंवा नोकरी करण्यासाठी परवानगी मिळते.
अभ्यासक्रम
            आतापर्यंत आपण कंपनी सेक्रेटरी पदासाठी कोणत्या परीक्षा असतात हे पाहिलेले आहे. आता आपण या परीक्षेसाठी काय अभ्यासक्रम असते याचा अभ्यास करू. कोणते विषय असतात आणि किती गुण असतात याचा अभ्यास करू.
    सीएसइईटीसाठी एकूण चार विषय असतात. या विषयावर वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतात. गुणदान करताना ऋणात्मक पद्धतीचा अवलंब केला जात नाही. 
२ एक्झिक्यूटिव्ह प्रोग्रॅम साठी एकूण आठ विषय असतात. हे आठ विषय दोन मॉड्युलमध्ये विभागलेले. 
        मॉड्युल एकमध्ये चार विषय आणि मॉडेल दोन मध्ये चार विषय असतात.
३   प्रोफेशनल प्रोग्रॅममध्ये एकूण नऊ विषय असतात. हे विषय तीन मॉड्युलमध्ये डिवाइडेड आहेत. प्रत्येक मॉड्युलमध्ये तीन विषय असतात. मॉड्युल ३ मध्ये दोन विषय कंपल्सरी असून एक विषय ऑप्शनल आहे. ऑप्शनल विषयाचे पेपर सोडवताना आपण बुकचा वापर करू शकता.

कंपनी सेक्रेटरी बनण्यासाठी किती खर्च लागतो
            कंपनी सेक्रेटरी बनण्यासाठी अत्यंत कमी खर्च लागतो. कारण  दी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया जी संस्था आहे. ती दुरस्त शिक्षण देते. त्यामुळे तुम्हाला विद्यापीठात किंवा कॉलेजमध्ये जाण्याची जरुरत राहत नाही. तुम्ही घरून याचा अभ्यास करून परीक्षा देऊ शकतात. प्रथम रजिस्ट्रेशन साठी केवळ एक हजार रुपये देऊन. तुम्ही सीए सीईटीची परीक्षा देऊ शकता.
            एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम तुम्ही फाउंडेशन कोर्स किंवा सीईटी पास केली असेल केवळ आठ हजार पाचशे रुपये नोंदणी करून परीक्षा देता येते. अनुसूचित जाती जमाती. तसेच माजी सैनिक आणि सैनिकाच्या विधवांना फीमध्ये सवलत देण्यात येते.
        केवळ फी आणि परीक्षेला जाण्यायेण्याचा खर्च जर पकडण्यात तर पंचवीस हजार रुपये तुम्ही परीक्षा पास करू शकता. जर तुम्ही शिकवण्या लावल्या तर 70 ते 75 हजार रुपये लागू शकतात. कंपनी सेक्रेटरी बनण्याचा संपूर्ण खर्च एक लाख रुपये पर्यंत येऊ शकते.

                    कंपनी सेक्रेटरी बनल्यानंतर ज्याप्रमाणे डॉक्टर किंवा वकील आपली प्रॅक्टिस करून पैसे कमावतात त्याचप्रमाणे या प्रोफेशन मध्ये सुद्धा आहे. कोणत्याही कंपनी सेक्रेटरीला फिक्स पेमेंट नसतो. कंपनीमध्ये मिळणारा पेमेंट फिक्स असतो. कंपनी परत्वे मिळणारे वेगवेगळे असू शकते. साधारणपणे नवीन उमेदवारास 50 हजार रुपये पासून पेमेंट मिळण्यास सुरुवात होते.
                याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायचे असल्यास
आयसीएसआयची वेबसाईट देत आहोत. ही माहिती तुम्हाला निश्चितच उपयोगी पडेल अशी आशा करतो. आपण ही माहिती शेअर करू शकता. आता लेखणीला विराम देतो. धन्यवाद!
Share This
Previous Post
Next Post

Pellentesque vitae lectus in mauris sollicitudin ornare sit amet eget ligula. Donec pharetra, arcu eu consectetur semper, est nulla sodales risus, vel efficitur orci justo quis tellus. Phasellus sit amet est pharetra

0 Comments:

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.