नोकरी विषयक जाहिराती

ad300
Advertisement
महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव कार्यालयात 31 जागा
महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव कार्यालय व राज्यपाल परिवार प्रबंधक कार्यालयात सहायक (3 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), लिपिक टंकलेखक (4 जागा), संदेशवाहक (6 जागा), माली (5 जागा), सफाईगार/स्वच्छक (2 जागा), सहाय्यक-खाद्यपेय (4 जागा), प्लेट वॉशर (2 जागा), कचरा मजदूर (2 जागा), टेनिस बॉय (1 जागा), झिलाईकार-पॉलिशर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतच्या 9 जानेवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.exxononline.net/rajbhavan या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

उपसंचालक, भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या नाशिक विभागीय कार्यालयात 14 जागा
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या औरंगाबाद विभागीय उपसंचालक, भूजल सर्वेक्षण यंत्रणा या कार्यालयात सर्वेक्षक (8 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली वरिष्ठ सहाय्यक-आरेखक (1 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक (५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 23 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Marathi/GSDA%20Advertisement-Aurangabad.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

औरंगाबाद येथील शासकीय लेखनसामग्री व ग्रंथागारमध्ये 3 जागा
महाराष्ट्र शासनाच्या औरंगाबाद येथील सहायक संचालक, शासकीय लेखनसामग्री व ग्रंथागारमध्ये शिपाई (2 जागा), मजूर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात व माहिती https://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Marathi/Scan_6-Aurangabad.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

माझगाव डॉकमध्ये कुशल व अकुशल तांत्रिक वर्गाच्या 54 जागा
माझगाव डॉकमध्ये कुशल व अकुशल तांत्रिक वर्गाची भरती होणार आहे. यामध्ये ज्यु. ड्राफ्टसमन (2 जागा), भांडारपाल (3 जागा), फिटर (2 जागा), स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर (1 जागा), पाईप फिटर (11 जागा), रिगर (10 जागा), कॉम्प्रेसर अटेंडंट (1 जागा), लश्कर (1 जागा), मिलराईट मेकॅनिक (2 जागा), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (2 जागा), पेंटर (5 जागा), सुतार (4 जागा), कंम्पोझाईट वेल्डर (3 जागा), सुरक्षा शिपाई (1 जागा), अग्निशामक (2 जागा), युटिलिट हँड (3 जागा), चिपर ग्राईंडर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 22 जानेवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 70 जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयात विविध विषयातील प्राध्यापक (३२ जागा), प्राचार्य (1 जागा), विभाग प्रमुख (4 जागा), प्राध्यापक (4 जागा), सहयोगी प्राध्यापक (9 जागा), सहायक प्राध्यापक (10 जागा), प्राचार्य, शासकीय विधी महाविद्यालय (1 जागा), महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व वैद्यकीय द्रव्ये विभागातील प्राध्यापक- शरीरक्रिया (4 जागा), प्राध्यापक-त्वचा व गुप्तरोगशास्त्र (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती www.mpsconline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 4 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सामान्य प्रशासन विभागातील भाषा संचालक- सामान्य राज्य सेवा गट अ (1 जागा), बृहन्मुंबई महानगर पालिकेतील प्राध्यापक-हृदयरोग चिकित्साशास्त्र (1 जागा), गृह विभागातील पोलीस उपअधिक्षक/सहायक पोलीस आयुक्त-मोटार परिवहन (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती  www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळात लिपिक टंकलेखकाच्या 33 जागा
महाराष्ट्र शासनाच्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळात लिपिक टंकलेखक (33 जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीत दि. 5 जानेवारी 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mamfdc.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकत लघुलेखक-कनिष्ठ श्रेणीच्या 98 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकत लघुलेखक-कनिष्ठ श्रेणी (98 जागा) हे पद थेट भरतीद्वारे भरण्यात येणार आहे. ही भरती दि. 7 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2014 या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये 8 जानेवारी 2014 रोजीच्या अंकात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयात 95 जागा
महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या अधिपत्याखालील कार्यालयात लघुलेखक-निम्नश्रेणी (1 जागा), यांत्रिक निर्देशक (5 जागा), सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (14 जागा), सांख्यिकी सहाय्यक (5 जागा), वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी अन्वेषक (22 जागा), ग्रंथपाल (१ जागा), कनिष्ठ लिपिक/वसुली सहाय्यक/रोखपाल/मत्स्यक्षेत्र प्रगणक/लिपिक नि टंकलेखक (32 जागा), वाहनचालक (3 जागा), क्षेत्र समाहारक (1 जागा), मत्स्यक्षेत्रिक (6 जागा), शिपाई (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी 15 जानेवारी ते 31 जानेवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये 1 जानेवारी 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/fisheries या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये कनिष्ठ लिपिकच्या 4 जागा
संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये कनिष्ठ लिपिक (4 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/cantonment या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागात शिपाई व लिपिक पदाच्या 589 जागा
महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागातील विविध कारागृहात गट ड ची पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये कारागृह शिपाई हे पद दक्षिण विभाग मुंबई यांच्या अधिनस्त कारागृहात (१११ जागा), पश्चिम विभाग, पुणे (126 जागा), मध्य विभाग, औरंगाबाद (201 जागा), पूर्व विभाग, नागपूर (103 जागा) ही पदे तसेच लिपिक पदाच्या जागा या दक्षिण विभाग, मुंबईमध्ये (12 जागा), पश्चिम विभाग, पुणेमध्ये (9 जागा), मध्य विभाग, औरंगाबादमध्ये (11 जागा), पूर्व विभाग, नागपूरमध्ये (16 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती व अर्ज www.mahaprisons.gov.in व http://oasis.mkcl.org/dig या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचानालयाच्या नागपूर विभागात ४ जागा
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचानालयाच्या नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर व भंडारा या कार्यालयात लिपिक टंकलेखक (2 जागा), शिपाई (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती
https://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Marathi/Vacancy%20Press%20Notes1_30122013.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवेच्या 93 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षेची घोषणा केली आहे. या परीक्षेद्वारे पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त (24 जागा), उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (9 जागा), सहायक संचालक-महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (7 जागा), कक्ष अधिकारी (2 जागा), सहायक गट विकास अधिकारी (46 जागा), उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (2 जागा), सहायक आयुक्त प्रादेशिक परिवहन अधिकारी (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जानेवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.mahaonline.gov.in व http://mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

उपसंचालक, भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या नाशिक विभागीय कार्यालयात 13 जागा
नाशिक विभागीय उपसंचालक, भूजल सर्वेक्षण यंत्रणा या कार्यालयात सर्वेक्षक (2 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली वरिष्ठ सहाय्यक (1 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक (7 जागा), वरिष्ठ लिपिक (1 जागा), कनिष्ठ लिपिक (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Marathi/WSSD20131219.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Share This
Previous Post
Next Post

Pellentesque vitae lectus in mauris sollicitudin ornare sit amet eget ligula. Donec pharetra, arcu eu consectetur semper, est nulla sodales risus, vel efficitur orci justo quis tellus. Phasellus sit amet est pharetra

0 Comments:

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.