अकोला जिल्ह्यातील शाळा टप्प्या टप्प्याने सुरु



अकोला,दि.१८(जिमाका)-  शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी शाळा टप्प्या टप्प्याने सुरु करण्यासाठी शासनाने सविस्तर निर्देश जारी केले आहेत. जिल्ह्यातील शाळा त्याच पद्धतीने सुरु करण्यासाठी  शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यातील शाळा टप्प्या टप्प्याने सुरु करण्याबाबत नियोजन करण्यासाठी  आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. वैशाली ठग,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी  सुरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी   फडके तसेच सर्व उपशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते.
 यावेळी  शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ सुरु करण्याबाबत शासनाने  दि.१५ जून रोजी जारी केलेल्या परिपत्रकाची माहिती देण्यात आली. त्यानुसार  शाळा ह्या टप्प्या टप्प्याने सुरु  करतांना प्रथम जुलै महिन्यात इयत्ता ९ वी, १० वी व १२ वी हे वर्ग सुरु होतील. त्यानंतर ऑगस्ट मध्ये इयत्ता सहावी ते आठवी चे वर्ग सुरु होतील. सप्टेंबर मध्ये इयत्ता तिसरी ते पाचवी चे वर्ग सुरु होतील. इयत्ता पहिली व दुसरीचे वर्ग  केव्हा सुरु करायचे याबाबत स्थानिक पातळीवर शाळा व्यवस्थापन समितीने  निर्णय घ्यावा. तसेच इयत्ता अकरावीचे वर्ग हे  इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर  सुरु करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.
शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापनाने  पूर्व तयारी पंधरवडा राबवावयाचा आहे. त्यात शाळा व्यवस्थापन समितीची (ऑनलाईन) सभा आयोजित करणे, पाठ्यपुस्तक वितरण,  शाळेच्या इमारतीचे स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे, गटागटाने पालकांच्या सभा घेणे, शाळा बाह्य मुलांच्या घरी भेटी देणे,  शालेय विद्यार्थ्यांचे आधार क्रमांकाचे अद्यावतीकरण करणे. ग्रामपंचायतीच्या मदतीने टीव्ही, रेडिओ, कॉम्प्युटर यांची सुविधा उपलब्ध करुन मुलांना मदत करणे,  गुगल क्लासरुम, वेबिनार, डिजीटल शिक्षणासाठी शिक्षक व पालकांचे सक्षमीकरण करणे, दीक्षा ॲपचा प्रसार,  इ-कन्टेंट निर्मिती इ. बाबत तयारी करण्यात येणार आहे.
या पद्धतीने सर्वअंमलबजावणी करण्यासाठी  सर्व शिक्षकांनी दि.२६ जून रोजी हजर व्हावे. हजर होतांना त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, असे यावेळी सांगण्यात आले.  जेथे नियुक्ती आहे तेथेच शिक्षकांनी  रहावे, असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले.

रोजगारसंधींची माहिती बेरोजगार तरुणांना आता संकेतस्थळावर मिळणार



मुंबई, दि. 18 : राज्यातील उद्योगांमधील उपलब्ध रोजगारसंधींची माहिती बेरोजगार तरुणांना आता संकेतस्थळावर मिळणार आहे. याशिवाय याच संकेतस्थळावर उद्योजकांनाही राज्याच्या विविध भागात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची माहिती मिळणार आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे उद्योजक आणि त्यांना आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळामध्ये समन्वय साधून दोघांनाही उपयोगी ठरणारे माध्यम तयार करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली.

खाजगी, शासकीय रोजगारसंधींची माहिती होते उपलब्ध

बेरोजगार तरुणांसाठी या संकेतस्थळावर विविध सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी त्यांनी संकेतस्थळावर त्यांच्या शैक्षणिक आणि इतर माहितीसह नोंदणी करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे आवश्यकतेनुसार एखाद्या उद्योग अथवा आस्थापनेकडून त्यांना जॉब ऑफर मिळू शकते. याशिवाय नोकरी साधक (नोकरी शोध) याठिकाणी क्लिक केल्यावर रोजगार यादी, क्षेत्र, स्थान व शिक्षणानूसार रोजगार संधींची माहिती मिळते. विविध माध्यमांमध्ये प्रसिध्द होणाऱ्या रिक्त पदांच्या जाहिराती पाहण्यासाठी “रिक्तपदांच्या जाहिराती” (Vacancy Advertisement) या टॅबव्‍दारे माहिती मिळू शकते. शासकीय तसेच खासगी अधिसूचीत रिक्तपदांची माहिती, त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करणे, राज्यभरात आयोजित होणाऱ्या रोजगार मेळाव्यांची माहिती मिळवणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमात सहभागी होणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे आणि सहभाग घेणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयंरोजगारासाठी योजनांची माहिती मिळविणे व लाभ घेण्यासाठी उचित योजनेंतर्गत प्रकरण सादर करणे आदी कार्यवाही करता येते.

उद्योजकांना मिळते नोकरी इच्छुक उमेदवारांची माहिती

संकेतस्थळावर उद्योजकांसाठीही विविध सुविधा उपलब्ध आहेत. नोंदणी केलेल्या नोकरीइच्छुक उमेदवारांची माहिती, त्यांचे शिक्षण, कौशल्य, अनुभव, ठिकाण याप्रमाणे एकत्रितरित्या संकेतस्थळावर उपलब्ध होते. याशिवाय उद्योजक म्हणून नोंदणी करणे, नवीन प्लांट, शाखेची स्वतंत्र नोंद करणे, वेळोवेळी निर्माण होणारी रिक्‍तपदे अधिसूचित करणे, त्याअन्वये नोंदविलेल्या मागणीनुसार सिस्टीमद्वारे पुरस्कृत पात्र उमेदवारांची यादी मिळविणे, या पदांची विनामुल्य प्रसिद्धी करणे, ही यादी पीडीएफ किवा एक्सेलमध्ये डाऊनलोड करणे, मुलाखती आयोजित करणे, प्राथमिकरित्या निवडलेल्या उमेदवारांना सिस्टीमद्वारे विनामुल्य एसएमएस पाठविण्याची सुविधा, मुलाखत प्रक्रियेनंतर रुजू झालेल्या उमेदवारांचे प्लेसमेंट ऑनलाईन नोंदविणे आदी कार्यवाही करता येते. उद्योजकांना सीएनव्ही कायदा १९५९ अंतर्गत बंधनकारक असलेले त्रैमासिक मनुष्यबळ विवरणपत्रही या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करता येते.

संकेतस्थळावर रोजगार विषयक सर्व सेवा ह्या उद्योजक आणि उमेदवार या दोघांनाही विनामुल्य उपलब्ध आहेत. सर्वांनी www.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे देऊ केलेल्या सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी केले आहे. याबाबत काही अडचणी असल्यास जिल्ह्यातील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी संपर्क साधावा.

Top Careers

Top Careers
Top careers
विद्यार्थी मित्रहो आतापर्यंत दहावी बारावी नंतर काय या पुस्तकांमध्ये आपणविकले विषयक माहिती पाहिलेली आहेया सर्व माहिती मध्येजास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनचांगली करिअर करण्याची संधी आहेआणि ही सहकार्याची संधी जर हातातून गमवायची नसेलतर इतर विद्यार्थ्यांप्रमाणे चे विद्यार्थी आज रोजी करत आहेत ते जर पुढे करत राहिली तर आतापर्यंत त्यांना मिळालेला आहे ते तुम्हालाही मिळेल म्हणून इतर विद्यार्थ्यांनी पेक्षा काहीतरी वेगळं करायला पाहिजे या उद्देशाने तुम्ही जर स्पर्धापरीक्षेची तयारी करत असालस्पर्धा परीक्षेच्या तयारीची सुरुवात नेमकी कधी करावी याचे जर उत्तरस्वतःलाच विचारलं तर स्पर्धापरीक्षेची तयारी ही अगदी तुमचा देणे मिरची झाल्यापासून करता येतेआणि लिहिण्याची कधी करता येते याचा आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे त्याच्या खोलात न जाता सरळ शिक्षणा बरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करता येईलया बद्दलचा विचार आपण या प्रकरणात करणार आहोत

विद्यार्थी साधारणता दहावी पास झाल्यानंतर मोठ्या उत्साहाने आपली स्ट्रीम निवडतात निवडलेल्या स्टिममध्ये स्त्री निवडत असताना या विद्यार्थ्यांपुढे निश्चित असं भविष्य नसते. आपल्याला काय याची निश्चित नसल्यामुळे कोणतेही शाखा विद्यार्थी निवडून बसतात. कधी कधी नातेवाईक यांच्या सांगण्यावरून किंवा आई-वडिलांच्या अट्टाहासामुळे विद्यार्थी विज्ञान शाखा निवडतात परसेंटेज चांगला असेल तर विज्ञान शाखा मिळते. परसेंटेज कमी झाले तर विज्ञान शाखा मिळत नाही मग अशा वेळेस काही विद्यार्थी वाणिज्य शाखेकडे वळतात. तर काही विद्यार्थ्यांना तेथे ऍडमिशन मिळत नाही म्हणून असे विद्यार्थी कला शाखेकडे वळतात. आपल्या सोबतचे इतर विद्यार्थी किंवा आपले मित्र मैत्रिणी या शाखेकडे जात असतील या शाखेकडे आपण जात असतो.

स्त्रीमध्ये आपल्याला आपल्या विषयाची ओळख होऊन जाते व आपल्याला कोणत्या शाखेतजायचे होते कोणत्या शाखेत येऊन बसलो आपली निवड चुकली विद्यार्थ्यांना बारावी झाल्यानंतर लक्षात येते .काही विद्यार्थी नंतर पुढे शाखा बदल करून कला विज्ञान आणि वाणिज्य या शाखांचा पुन्हा अभ्यास करण्यास सुरुवात करतात व आपल्या चुकलेलं पाऊल सुधारण्याचा प्रयत्न करतो. आपला चुकलेला निर्णय सुधारण्याचा प्रयत्न करतात.

बऱ्याच विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशनपूर्ण झाल्याबरोबर नोकरीची अपेक्षा असते सर्वच विद्यार्थ्यांना अशी अपेक्षा असते. परंतु ती अपेक्षेप्रमाणे ते अभ्यास करत नाही. आज कोणत्याही विद्यार्थ्याला विचारलं दहावी झाल्यानंतर काय करशील? तर त्याचं ठरलेलं उत्तर असते दहावी झाल्यानंतर पाहू. त्या विद्यार्थ्याला दहावी पास झाल्यानंतर विचारा परंतु विद्यार्थी तेच उत्तर देते बारावी झाल्यानंतर पाहू. परत या विद्यार्थ्याला विचाराचा बारावी झाली आता काय? तर तो परत तेच उत्तर देते आता ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पाहू. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर परत काय विद्यार्थ्याला तोच प्रश्न विचारला आता ग्रॅज्युएशन नंतर काय आता पोस्ट ग्रॅज्युएशन करून नंतर पाहू? असं नंतर पाहू हे उत्तर आहे यावरून त्या विद्यार्थ्यांचे ध्येय निश्चित नाही हे लक्षात येते. यांचे ध्येय निश्चित नसते. काय करावे हे निश्चित कळत नाही. कुठे जायचं हेच माहीत नसल्यामुळे कोणत्याही रस्त्यांनी कितीही दूर गेलो चालण्याचा काही फायदा होत नाही.ठिकाण निश्चित झाल्यानंतर जर तुम्ही अंतर कापलं तर तुम्ही योग्य दिशेने जात आहात लग्न ठिकाण जवळ आलेला आहे.किंवा आपण ठिकाणाच्या जवळ चाललो आहोत.याची जाणीव आपल्याला होत राहते.त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी.आपली शाखा निश्चित केल्यानंतर स्पर्धा परीक्षेतून आपल्याला कोणते करिअर निवडायचेयाचाही विचार करणे गरजेचे आहे. राज्यसेवेची परीक्षा द्यायची केंद्र सेवेची परीक्षा द्यायची. हे निश्चित झाल्यानंतर त्या उद्दिष्ट पूर्तीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. राज्यसेवेची परीक्षा द्यायची असल्यास राज्यसेवेच्या संपूर्ण अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे लिहून घेतला पाहिजे व त्या अनुषंगाने अभ्यास केला पाहिजे. आपण आपल्या अभ्यासाचं वार्षिक नियोजन तयार केले पाहिजे. मंत्री नियोजन तयार केला पाहिजे. विकली नियोजन तयार केले पाहिजे.एवढेच नाही तर डेली नियोजन सुद्धा करण्यास हरकत नाही.
पदवी परीक्षेचा अभ्यास करत असताना. आपल्याला काय काय करता येते. किंवा आपण काय काय करू शकतो. किंवा करिअर निवडताना नेमकं कोणत्या क्षेत्रात जायचं हे निश्चित करणे जरुरीचे असते. त्या अनुषंगाने आपल्याला पदवी मध्ये विषयाची निवड करता येते स्पर्धापरीक्षेची तयारी करत असल्यास कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये भारतीय राज्यघटनेची वरील प्रश्न दिलेले असतात लोकप्रशासन किंवा राज्यशास्त्र हे विषय निवडल्यानंतर तुमचा संविधानाचा अभ्यास पूर्ण होईल अभ्यास करण्यास तुम्हाला मदत होईल त्याचप्रमाणे अर्थशास्त्र आहे. समाजशास्त्र आहे. इतिहास आहे. भूगोल आहे. यापैकी काही विषय निवडून तुम्ही तुमची पदवी पूर्ण करू शकता. ती पदवी पूर्ण करत असतानाच तुम्हाला या विषयातून पूर्व परीक्षेसाठी कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचाही तुम्ही अभ्यास करू शकतात त्याचप्रमाणे मुख्य परीक्षेसाठी सुद्धा तुम्ही या विषयाची निवड करू शकतात त्यामुळे शिक्षणाबरोबरच तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करता येईल याचा विचार करता येतो. आठवी नववी दहावी मध्ये शिकत असताना आपण जर अंक गणित आणि भूमिती चा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षा देणे अगोदरच आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये विचारले जाणारे सर्व घटकांचा अभ्यास व्यवस्थित पूर्ण झालेला असेल. त्यामुळे स्पर्धा परीक्षा दिल्या बरोबर लगेच उत्तीर्ण करता येईल. म्हणजे आपला वेळ आणि श्रम त्या बाबीवर परत खर्च होणार नाहीत.
कोणत्याही स्पर्धा परीक्षा देत असताना. त्यामध्ये करंट अफेयर अर्थात चालू घडामोडी हा एक विषय असतोच त्यामुळे पदवीधर झालेल्या व्यक्तींनी समाजामध्ये घडणाऱ्या बाबींची त्याला किती जाण आहे? हे स्पर्धा परीक्षा घेणारे लोक तपासात असतात. करणाऱ्या घटना पदवीधर झालेल्या व्यक्ती वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसा पाहतो हेही महत्त्वाचे ठरते. त्याचा वैज्ञानिक दृष्टीकोन हा प्रकल्प करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे कमीत कमी तीन वृत्तपत्राचे वाचन केले पाहिजे एखादे वृत्तपत्र मातृभाषेतून एखादे वृत्तपत्र हिंदीतून एखादे इंग्रजी वृत्तपत्र वाचले पाहिजे. त्यामुळे तुमच्या तिन्ही भाषेचा सराव व्यवस्थित होईल. तिने भाषेमध्ये बोलता येईल. लिहिता येईल. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर राज्यपातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर काय घडामोडी घडत आहेत भारताच्या दृष्टीकोनातून काय परिणाम घडतो आहे त्याबद्दल तुमचे मन क्लीअर होण्यास मदत होते कोणताही एक वृत्तपत्र असल्याने आपल्याला आपला निकोप दृष्टिकोन बनवण्यास मदत होत नाही. त्यामुळे भाषेतील विविध वृत्तपत्रं वाचावीत. त्याचप्रमाणे रेडिओ आणि दूरदर्शनवरील बातम्या नियमितपणे ऐकावे. राज्य सरकारचे लोकराज्य आणि कुरुक्षेत्र किंवा योजना सारखे मासिकही वाचावीत शासनाचे विविध उपक्रम काय चालू आहे त्याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी ठेवणे गरजेचे असते. हे तुम्ही सर्व शिक्षणाबरोबरच करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे आणि वेळेचे नियोजन कसे करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांचा वेळ नुसता गेम खेळण्यात केव्हा व्हिडिओ पाण्यात न व्यर्थ घालवता आपल्याला निवडलेल्या करिअरच्या दृष्टिकोनातून काय करता येते किंवा करायचं आहे ते करत राहणे. म्हणजे आपल्याला टाईमपास करण्याची वेळ येणार नाही. कोणालाही टाईमपास करता येत नाही. टाईम आहे ऑटोमॅटिक पास होत असतो. जे विद्यार्थी टाईमपास करतात त्यांना टाईम कधीच पास करून गेलेला असतो आणि जे विद्यार्थी नेहमी आपलं काम करण्यात मग्न असतात नवीन काहीतरी शिकण्याची व्यस्त असतात त्यांना टाईमपास करण्याची गरज पडत नाही त्याकडे टाईमपास करण्यासाठी वेळच नसतो किंवा त्यांना त्यांचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी वेळ अपुरा पडतो.

महिलांसाठी विशेष करिअर

महिलांसाठी विशेष करिअर
                    पूर्वी महिलांना शिक्षणाची दारे बंद होती. आता महिलांनाही शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. त्यामुळे महिलांना आपली प्रगती सिद्ध करण्याची संधी मिळते आहे. दहावी आणि बारावीमध्ये चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनींची बोर्डातील संख्या दिवसेंदिवस वाढते आहे तरीही काही कुटुंबातील स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते त्यांचा आदर केला जात नाही. काही कुटुंबात तर मुलीला जन्माला सुद्धा घालत नाही. मुलीला जन्घामास घालत नाहीत म्हणून सरकारने बेटी बचाव बेटी पढाव अशी घोषणा केली आहे. व मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून शासनाने सुकन्या योजना सुरु केली आहे. या प्रकरणात आपण शिक्षित तथा अशिक्षित किंवा उच्चशिक्षित महिलांसाठी कोणकोणते करिअरचे पर्याय उपलब्ध आहेत याचा अभ्यास करणार आहोत

                       चूल आणि मूल ही एकच म्हण स्त्रियांसाठी लागू होती या म्हणीचा अर्थ व्यापक होता की महिलांनी पुरुषांसाठी जेवण बनवणे आणि मुलं सांभाळणे एवढेच काम करायचं ते त्यांनी बाहेरची कामं कोणतीही करू नये किंवा माणसाच्यामध्ये बोलू नये अशा विविध प्रकारच्या अटी महिलांसाठी होत्या महिलांना संधी मिळाली तर महिलाही संधीचे खूप मोठे सोनं करू शकतात भारतीय संविधानाने महिलांना व पुरुषांना समान अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे समान कामासाठी समान वेतनही दिल्या जाते. संविधानाने संधी दिल्यामुळे भारताच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर महिला जाऊ शकते हे आपण पाहिलेले आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या कुवतीप्रमाणे, आवडीप्रमाणे, इच्छे प्रमाणे कोणताही व्यवसाय करण्यास काही हरकत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. पुरुषांपेक्षा सरस काम करत आहेत. अशाच काही महिलांसाठी असलेल्या करिअरची माहिती आपल्यासाठी देत आहोत
                   
             चूल आणि मूल या मुली तसेच महिलांनी आपले करिअर करण्याचे ठरवले आहे काही ठिकाणी महिलांनी खानावळी सुरू केलेल्या आहेत खानवडी तू नही चांगला व्यवसाय किंवा चांगली आर्थिक प्राप्ती होऊ शकते. काही स्त्रिया स्वयंपाक बनवून देण्याचे पैसे घेतात पाचशे ते सहाशे रुपये प्रति व्यक्ती प्रमाणे जेवण बनवून देण्याचे पैसे घेतात. तो एक यांच्यासाठी स्वयंरोजगाराच आहे. त्यातूनही स्त्रिया चांगली अर्थप्राप्ती करत आहेत काही स्त्रियांनी हो स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू करून त्यातून अर्थप्राप्ती करीत आहेत. 
        
                    लहान मुलं सांभाळणे सुद्धा एक करिअर होऊन बसले आहे विभक्त कुटुंबपद्धती असल्यामुळे कामावर जाणारे दाम्पत्ती त्यांच्या अपत्यांना पाळणाघरांमध्ये ठेवतात. पाळणाघर चालवणे हे सुद्धा एक उत्तम करिअर बनले आहे. मुलाला जन्माला घालते सुद्धा एक उत्तम करिअर होऊ शकते त्याला सरोगेट मदर म्हणतात आणि सरोगेट मदरला भारतामध्ये अजून कायदेशीर व्यवसाय करण्याची मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे भारतातील स्त्रियांसाठी फारशी करिअर महत्त्वाचे नाही